पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर येथील निलयोग माॅल समोर एका उभ्या असलेल्या कार मधून लोकसभा निवडणूक सेलच्या स्टाॅटिक सर्वेलन्सच्या स्काॅडने अचानकपणे केलेल्या तपासणीत एकूण ७२ लाख ३९हजार ६७५ रुपयांची रोकड जप्त केली आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या या कारवाई मुळे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान सदरची रक्कम ही दिलीप वेलजी नाथांनी व अतुल वेलजी नाथांनी या दोघा संख्या भावांच्या कार मधून ही रक्कम आढळून आली आहे.दरम्यान चौकशी वेळी ही रक्कम वाशी येथील विकासकामांची असल्याचे या दोघा भावांनी सांगितले आहे.दरम्यान या प्रकरणी पुढील तपास हा आयकर विभागाच्या वतीने सुरू आहे.