पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थाना बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स तसेच ( RAF) सोबत दिल्ली पोलिस देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान केजरीवाल यांच्या निवासस्थाना समोर कलम १४४ लागू करण्यात आले आहे.त्यांच्या निवासस्थाना बाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली केली आहे.