पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ठाणे जिल्ह्यात आगीची मोठी घटना घडली असून डोंबिवली पूर्व कडील टाटा पॉवर गोळावली येथे मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गोडवानला भीषण आग लागली होती. दरम्यान आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम करत आहे.आग ही एवढी भयानक असून या ठिकाणी एकूण १० ते १२ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी असून अग्निशमन दलाचे जवान हे आगीवर नियंत्रण मिळवत आहेत.या भागात सर्वत्र धुराचे लोटच लोट दिसत आहे.
दरम्यान या आधीच भिवंडी येथे एका भंगाराच्या गोदामाला आग लागली होती.त्या नंतर आज पून्हा डोंबिवली येथील पूर्व कडील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.दरम्यान आगीचे सत्र सुरूच आहे.दरम्यान हे भंगाराचे गोदाम मोठे असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील भंगार विक्रेते हे आजुबाजुच्या परिसरातून भंगार गोळा करून या भंगाराच्या दुकानदाराला विकतात.दरम्यान या भागात एकूण ३० ते ४० भंगाराचे गोडवान आहेत.हे सर्व गोडवान आगीत जळून खाक झाले आहेत.दरम्यान या आगीत कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही परंतु भंगाराच्या दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदरची आग ही कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरची आग ही शाॅकसर्किट मुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे.