Home भूकंप परभणी.हिंगोली.नांदेडमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के

परभणी.हिंगोली.नांदेडमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के

227
0

पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार परभणी जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यात तसेच परभणी भागात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ४.२ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे.अचानकपणे भूकंपाचे धक्के जाणवल्या नंतर या जिल्ह्यात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान हिंगोलीत वसमत.कळमनुरी.औंढा.या तालुक्यातील अनेक गावांना हे धक्के जाणवले आहेत.या भूकंपाचा केंद्रबिंदू हा बाळापूर पासून १५ किलोमीटर अंतरावर होता.दरम्यान या भूकंपानंतर प्रशासनाच्या वतीने ज्यांचे नुकसान झाले असेल त्यांनी प्रशासना बरोबर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleपुण्यातून आमदार रविंद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी काॅग्रेसची उमेदवारी जाहीर
Next articleभिवंडी नंतर डोंबिवलीत भंगाराच्या ३० ते ४० गोडाऊनला भीषण 🔥 आगीवर नियंत्रण आणण्यांचे प्रयत्न सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here