पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्ली येथे एक मोठी दुर्घटना घडली असून इमारतीचे बांधकाम सुरू असताना एक जुनी इमारत अचानकपणे कोसळून झालेल्या दुर्घटनेत काम करणाऱ्या दोन कामगारांचा मलबार अंगावर पडून दोन कामगार यांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य कामगार हे जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.सदरची दुर्दैवी घटना ही रात्रीच्या सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की दिल्ली येथे मध्यरात्रीच्या सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान सदरची घटना ही रात्रीच्या वेळेस घडल्यामुळे या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली नाही.दरम्यान या घटनेची माहिती उशिरा पोलिसांना देण्यात आली.सदरची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व मदत बचावकार्य सुरू केले. ईशान्य दिल्लीतील वेलकम परिसरातील कबीर नगर मध्ये ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.दरम्यान या इमारतीत कोणी राहत नव्हते या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर काम सुरू होते.इमारत कोसळल्यावर तीन कामगार हे इमारतीच्या मलब्याखाली सापडले होते.या तिघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यापैकी १) अर्शद (वय ३०) २) तौहिद (वय २० ) या दोघांचा मृत्यू झाला तर रेहान ( वय २२) हा गंभीर झाला असून त्यांच्यावर जीटीबी रुग्णांलयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.