पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर स्टेट बॅक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांबाबत संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे.या डाटामध्ये निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता रोखे खरेदी करणारा आणि कोणत्या राजकीय पक्षाच्या खात्यावर पैसे गेले याची आता संपूर्ण पोलखोल होणार आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज प्रतिज्ञापत्र दाखल करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालन केले आहे.निवडणूक आयोगाला रोखे खरेदी करणारे आणि कोणत्या राजकीय पक्षांच्या खात्यात पैसे गेले याची संख्या दिली आहे.स्टेट बॅक ऑफ इंडियाचे दिनेश खारा यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की बॅकेने आता निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्याच्या खरेदीदाराचे नाव निवडणूक रोख्याची रक्कम कोणत्या पक्षाने घेतली आणि निवडणूक रोख्याचा विशेष क्रमांक व कोणत्या पक्षाच्या खात्यात किती पैसे गेले.त्याचे नाव आणि पक्षाच्या बॅक खात्यातील शेवटचे चार अंक दिले आहेत.व त्यात म्हटले आहे की निवडणूक रोख्याचे अन्य कोणता तपशील आता बॅकेकडे नाहीत.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्याची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे सोपविली आहे.निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीत निवडणूक रोख्याचे विशेष नंबरांचा देखील समावेश आहे.या विशेष नंबरच्या सहाय्याने रोखे खरेदी करणारा आणि कोणत्या राजकीय पक्षांच्या खात्यावर पैसे गेले याची माहिती आता मिळणार आहे.