Home क्राईम अकोल्यात भर रस्त्यात अचानकपणे कारने घेतला पेट जिवीतहानी नाही

    अकोल्यात भर रस्त्यात अचानकपणे कारने घेतला पेट जिवीतहानी नाही

    193
    0

    पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अकोल्यात भर रस्त्यात उभ्या कारने अचानकपणे पेट घेतल्याची घटना शहरातील फतेह चौकात घडली आहे.दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्या नंतर त्यांनी कारला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.सुदैवाने या कार आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

    दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरातील फतेह चौकात उभ्या असलेल्या कारला अचानकपणे आग 🔥 लागली.ही घटना दुपारच्या वेळी घडली.दरम्यान ही कार उभी असताना कारच्या बोनेट मधून अचानकपणे धूर निघत होता.त्यावेळी नागरिकांनी कार जवळ जावून पाहिलं असता कारने एकदम मोठ्या प्रमाणावर पेट घेतला.व कारला लागलेली आग विझवण्यासाठी नागरिकांनी प्रर्यत्न केला . परंतु आग मोठ्या प्रमाणावर लागल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली व या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे.सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.मात्र कार आगीत जळून खाक झाली.

    Previous articleछत्तीसगड येथील दंतेवाडामध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार तर दोन जवान जखमी
    Next articleहोळीच्या सणानिमित्त चाकरमनी निघाले गावाला मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here