पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट झाला आहे.सदरच्या घटनेत सहा कामगार जखमी झाले आहेत.इंडोरामा कंपनीत टॅंक दुरुस्ती दरम्यान हा स्फोट झाला आहे.स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीत हा लागोपाठ दुसरा स्फोट झाला आहे.एक स्फोट गुरुवारी झाला होता.तर दुसरा स्फोट हा शुक्रवारी झाला आहे.दरम्यान या इंडोरामा कंपनीत टॅंक दुरुस्तीचे काम सुरू होते.त्या दरम्यान हा स्फोट झाला आहे.दरम्यान सलग दोन दिवस स्फोट झाल्याने कंपनी व्यवस्थापणाने या स्फोटानंतर कमालीची गुप्तता पाळली होती.दरम्यान दोनदा झालेल्या स्फोटात एकूण सहा कामगार हे जखमी झाले आहेत. कंपनीत लगातार काम करीत असताना स्फोट झाल्याने कामगारांना मध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.