Home अंतर राष्ट्रीय रशियाची राजधानी मॉस्को येथील हल्ल्यात १४० नागरिकांचा मृत्यू १४५ जण गंभीर रित्या...

    रशियाची राजधानी मॉस्को येथील हल्ल्यात १४० नागरिकांचा मृत्यू १४५ जण गंभीर रित्या जखमी

    211
    0

    पुणे दिनांक २३ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रशियाची राजधानी मॉस्को येथे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.दरम्यान या हल्ल्यामुळे संपूर्ण माॅस्को शहर दहशती खाली आहे.एका काॅन्सर्ट हाॅल मध्ये अचानकपणे पाच बंदुकधारी हल्लेखोर आत शिरल्यावर त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला.दरम्यान या गोळीबारात १४० निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे.तर यात एकूण १४५ नागरिक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान या काॅन्सर्ट हाॅलमध्ये उपस्थित असलेल्या १०० नागरिकांना दगंलविरोधी पथकाने रेस्क्यू केले आहे.दरम्यान या हल्ल्यानंतर काही वेळा नंतर सदर हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

    दरम्यान रशियाची राजधानी मॉस्को येथे झालेल्या हल्ल्यात युक्रेनचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे.परंतू या आरोपाचे युक्रेनने खंडण केले आहे.हे आरोप बिनबुडाचे आहेत.व निराधार आहेत.असे युक्रेनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनला  बदनाम करण्याचा हा डाव आहे.दरम्यान या दाव्या बाबत अमेरिकेने देखील युक्रेनला क्लिनचीट दिली आहे.मात्र रशियाकडून मात्र आक्षेप घेण्यात आला आहे.

    Previous articleदिल्लीतील बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस रवाना
    Next articleरशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला निषेध

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here