पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे लोकसभा मतदारसंघाचे काॅग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी निवडणूकीची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.आज रविवारी दिनांक २४ मार्च रोजी पहाटे धंगेकर यांनी पुण्यातील मोतीबाग येथील निवासस्थानी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.यावेळी रविंद्र धंगेकर यांच्यासोबत मोहन जोशी व काॅग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच रविंद्र धंगेकर हे पवारांच्या भेटी साठी आले आहेत.