पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणा व सावळा गोंधळ घडला आहे.दरम्यान या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर परिचारीकेने रुग्णांना ‘ए’ ऐवजी ‘बी’ व ‘बी’ ऐवजी ‘ए’ रक्त देवून रक्त गटाची अदलाबदली केली.त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची तब्येत खालावली.दरम्यान या प्रकरणी आमदार अश्र्विनी जगताप यांनी या घटनेची तातडीने दखल घेत हलगर्जीपणा करणा-या परिचारिका व डॉक्टर यांना खडसावले आहे.या प्रकरणी सांगवी पोलिस स्टेशन व एडीएच या प्रशासनाकडे रुग्णांच्या नातेवाइकांनी रितसर तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औंध येथील शासकीय रुग्णालयात दत्तू सोनाजी सोनवणे (वय ५८ ) व दगडु सोनवणे हे दोघेजण उपचारासाठी दाखल आहेत.दरम्यान दिनांक २३ मार्च रोजी यांना रक्त चढविताना ते चुकीचं रक्त दिल्यानं या दोन्ही रुग्णांची प्रकृती खालावली नंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले गेले आहे.दरम्यान या रुग्णांना रक्त ट्रान्सफ्युजन केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली असे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.दरम्यान या घटनेची माहिती आमदार अश्र्विनी जगताप यांनी तातडीने औंध येथील शासकीय रुग्णालयात जाऊन या रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टर यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.व यात दोषी असणाऱ्या परिचारिका व डॉक्टर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे.