Home भूकंप लातूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का दोन सेकंद जमीन हादरली

लातूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का दोन सेकंद जमीन हादरली

204
0

पुणे दिनांक २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे आज बुधवारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास २.६ तिव्रतेचा भूकंप झाला आहे.यावेळी अचानकपणे मोठा आवाज झाला व जवळपास दोन सेकंद जमीन हादरली.यावेळी औरादसह.तगरखेडा.व कर्नाटका मधील वांजरखेडा या गावातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.व सर्व जण घराच्या बाहेर पडले.दरम्यान भूकंप नोंदणी विभागाच्या वतीने अजयकुमार वर्मा यांनी या भूकंपाच्या घटनेला दुजोरा दिला आहे.दरम्यान काल देखील बुलढाण्यातील शेगावात २.९ तिव्रतेचा भूकंप झाला होता.

Previous articleलोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर एकूण १७ उमेदवारांची घोषणा
Next articleविजयसिंह मोहिते पाटील परिवार पून्हा शरद पवार गटात जाणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here