Home राजकीय कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या एमडीएमकेचे खासदाराचा कार्डियक अरेस्टने मृत्यू

    कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या एमडीएमकेचे खासदाराचा कार्डियक अरेस्टने मृत्यू

    225
    0

    पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तामिळनाडूतील मारुमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाचे खासदार ए.गणेशमूर्ती यांचे आज पहाटे पाच वाजता कार्डियेक अरेस्टने रुग्णालयात निधन झाले आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी कीटकनाशक औषध प्रशासन करुन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न केला होता ‌त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र उपचारांदरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे.

    दरम्यान तामिळनाडू येथील इरोड मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए.गणेशमूर्ती यांनी दिनांक २४ मार्च रोजी कीटकनाशक औषध प्रशासन करुन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होता.मात्र आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा कार्डियेक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.ए.गणेशमूर्ती हे तामिळनाडू येथील एरोड मतदार संघाचे विद्यमान खासदार होते.२०१९ मध्ये ते मारुमालारची द्रविड मुन्नेत्र कळघमच्या तिकिटावर लोकसभे मध्ये निवडून गेले होते.दरम्यान त्यांच्या निधनाने ऐन निवडणुकीमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

    Previous articleविजयसिंह मोहिते पाटील परिवार पून्हा शरद पवार गटात जाणार?
    Next articleदेशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली चिंता व्यक्त

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here