पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या यांच्या गाडीला अपघात झाला असून.या अपघाता मध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत व दोन पोलिस कर्मचारी देखील यात जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलिस वाहन हे त्यांच्या गाडीला जोरात धडकल्याने हा अपघात झाला आहे.दरम्यान या अपघातात पोलिस वाहनांचे बोनेटचं नुकसान झाले आहे.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही .संबंधित अपघाताची दखल पोलिस प्रशासन व पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे.