पुणे दिनांक २ एप्रिल (पोलखोलनामाऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते अहमदनगर महामार्गावर असलेल्या वाघोली येथील बिवरी येथील गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सात अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा दाख दाखवून घरांवर दरोडा टाकला असून या दरोड्यात आरोपींनी रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.या दरोडा प्रकरणी गोते यांनी लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी गोते हे कुटुंबियांसमावेत घरात झोपले असताना सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सातजणांनी मिळून त्यांच्या घराचा दरवाजा कटवणीच्या सह्हयाने उघडून घरात प्रवेश करुन घरातील सर्वांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील कपाटातून ५ लाख रुपये रोकड व ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.दरम्यान या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.