Home राजकीय खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटात जाणार?

    खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटात जाणार?

    201
    0

    पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटाला जयमहाराष्ट्र करणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान हेमंत गोडसे यांना नाशिक येथून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.व महायुतीतून खास भाजपाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे समजते.त्यांना पुन्हा नाशिक मध्ये उमेदवारी दिल्यास भाजपाच्या सर्व्हे नुसार शिट धोक्यात असल्याचा त्यांचा दावा आहे.त्यामुळे हेमंत गोडसे हे नाराज असून त्यांना उमेदवारी मिळत नसल्याने ते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट नाशिकचे शिवसेना ऊध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.तर एवढे बोलून नाही तर हवं असेल तर सी.सी.टिव्ही.चे फुटेज देतो ‌.असेही बडगुजर यांनी म्हटले आहे.तर आज दुपारी साडेबारा वाजता भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.तर पुढील दोन दिवसात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट उमेदवार जाहीर करणार व मोठ्या मताने निवडून देखील येईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

    Previous articleतैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप सेकंदात कोसळल्या इमारती जपान देखील हायमोडवर
    Next articleसोलापूर येथील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग 🔥

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here