पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) तैवानची राजधानी तैपेई येथे आज बुधवारची सकाळ ही जोरदार भुकंपाने झाली .व हादरली भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी होती.सदरचा भूकंप इतका शक्तीशाली होता की यानंतर तैवान व जपान यांना देखील इशारा देण्यात आला आहे.मात्र या भूकंपानंतर कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.दरम्यान तैवानच्या हुआलियनमधून भूकंपाचे अनेक फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत.यात इमारती कोसळत असताना दिसत आहे.देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.यात भूकंपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये एक पाच मजली इमारत झुकल्याचे दिसत आहे.भूकंपा नंतर अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.व अनेक नागरिक हे इमारतींमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.या भूकंपामुळे नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत.