Home क्राईम सिंहगड रोडवरील नवले पुलाखाली बस व ट्रकचा विचित्र अपघात

    सिंहगड रोडवरील नवले पुलाखाली बस व ट्रकचा विचित्र अपघात

    188
    0

    पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सिंहगड रोडवरील अपघाताचा हाॅट्स्पाॅट व बदनाम झालेल्या नवले पुलाखाली आज शनिवारी सकाळच्या सुमारास ट्रक व लक्झरी बसचा विचित्र असा अपघात झाला आहे.यात एकूण तीन वाहने एकमेकांवर धडकली आहेत.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड वाहतूक शाखेचे पोलिस हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व अपघाता नंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी 👮 सोडवली आहे.अपघाता नंतर सकाळी सकाळी ऑफिसला जाणाऱ्या वाहन चालकांची वाहतूक कोंडी मुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे.आणि आता हे वाहतूक पोलीस व वाहनचालकांना रोजचेच मढं झाले आहे.या पूलाचे नाव नवले पूल बदलून नवले अपघात पूल असे नामकरण झाले आहे.

    Previous articleतैवाननंतर जम्मू काश्मीर व राज्यस्थान मध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के
    Next articleउध्दव ठाकरेंना धक्का… सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी?

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here