पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी पासून वसंतदादा पाटील यांच्या पासून काॅग्रेस पक्षाचा गड राहिला आहे.तर या जागेवर काॅग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे इच्छूक उमेदवार आहेत.तर या जागे साठी काॅग्रेस पक्षाचे आमदार विश्वजित कदम.व विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पक्षाकडे राहिला पाहिजे.म्हणून श्रेष्ठीकडे मागणी केली आहे.तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने या जागेवर पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे.व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही जागा आम्हीच जिंकणार असा दावा केला आहे.या मुळे आता या जागेवरुन महाविकास आघाडीत आता बिघाडी झाली आहे.आता या सर्व पार्श्वभूमीवर काॅग्रेस पक्षाचे विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम हे दोघेजण दिल्लीत ठाम मांडून बसले आहेत.काॅग्रेस पक्ष यावर आता काय तोडगा काढणार . याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.