पुणे दिनांक १० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण देशात गाजलेल्या मराठा आरक्षण संदर्भात आज बुधवार दिनांक १९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.दरम्यान मराठा समाजाला सरकारी नोक-या व शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात व समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे.सदरची सुनावणी आज उच्च न्यायालयात होणार आहे.दरम्यान आज मराठा आरक्षणांशी संबंधित या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय.व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या तीन सदस्यीय पूर्णपीठा पुढे ही सुनावणी होणार आहे.