पुणे दिनांक १० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यात बस तब्बल ५० फुट दरीत कोसळून भिषण असा अपघात झाला आहे.या अपघातात एकूण ११ प्रवाशांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.तर ९ प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.जखमींना तातडीने रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आले आहे.त्यांना तातडीने रायपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदरची बस केडिया डिस्टिलरीच्या एकूण २७ कर्मचाऱ्यांसह कुम्हरीहून भिलाईला येत असताना रात्रीच्या सुमारास बस खपरी रोडवरील पारा मुरुम खाणीत कोसळून भिषण अशी दुर्घटना घडली आहे.
दरम्यान छत्तीसगड येथील रायपूर -दुर्ग येथील ५० फुट मुरुमाच्या खाणीत कोसळून भीषण अपघात होऊन एकूण १२ जणांचा मृत्यू झाला यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.त्यांनी म्हटले आहे की ‘ छत्तीसगड येथे झालेला बस अपघात अत्यंत दु:खद आहे.ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले आहे.त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. तसेच या अपघातातील जगमींची प्रकृती लवकर बरी होवो अशी मी कामना करतो.दरम्यान छत्तीसगड राज्य सरकारच्या वतीने देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडीतांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे ‘ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.