पुणे दिनांक ११ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.पुण्यात काॅग्रेस पक्षाच्या वतीने आमदार रविंद्र धंगेकर व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्यात मुख्य लढत आहे.दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारासाठी गुंतले आहेत.तर काॅग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.आता रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काॅग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी देखील मैदानात उतरणार आहेत.
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या वतीने कसबा मतदार संघाचे काॅग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.रविंद्र धंगेकर यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांचे आव्हान आहे.त्याच बरोबर मनसेला जयमहाराष्ट्र करुन वंचित आघाडीत गेलेले वसंत मोरे यांचे कडवे आव्हान असणार आहे.या सर्व पार्श्वभूमीवर रविंद्र धंगेकर यांच्या साठी राहुल गांधी हे स्वतः मैदानात उतरणार आहे.