पुणे दिनांक ११ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण देशात लोकसभा निवडणूका लागल्या आहेत व याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान या कालावधीत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड जवळ ठेवता येत नाही.या कालावधीत जादा रोकड घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.पुणे व नागपूर येथे भरारी पथकाने लाखों रुपायांची रोकड जप्त करण्यात आली आहे.यात पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.पुण्यातील भोसरी एमआयडीसी पोलिसांनी 👮 फाॅरच्यूनर कारची तपासणी केली असता.त्यावेळी १३ लाख ९० हजार ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्या तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिसांनी शहरातील कमान पुलाजवळ कारवाई करुन एका खासगी वाहनांतून ५१ लाख १६ हजार रुपये जप्त केले आहे.अशी पुण्यात एकूण ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
दरम्यान नागपूर येथे देखील नागपूर ग्रामीण पोलिसांनी व एस एस टी या दोन्ही संयुक्त पथकाने कारवाई करत नागपूर ते चंद्रपूर महामार्गावर एका स्काॅरपिओ जीपमधून १० लाख ३५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.आता पुण्यात व नागपूर या दोन्ही ठिकाणी सापडलेली रोकड ही कुणाची आहे .व कोणत्या कारणासाठी वापरली जाणार होती.या गोष्टीचा शोध पोलिस घेत आहेत.ही संपूर्ण रोकड कोषागारात जमा करण्यात आली आहे.दरम्यान या रोकडचा लोकसभा निवडणुकीशी संबंध आहे का? हे आता प्रशासनाच्या वतीने तपासले जात आहे.