पुणे दिनांक १३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील विदर्भ तसेच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.भारतीय हवामान खात्याच्या विभागाच्या वतीने मध्य महाराष्ट्र.तसेच मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.यात प्रामुख्याने सोलापूर.जालना.परभणी.बीड.हिंगोली.नांदेड.लातूर.तसेच उस्मानाबाद.अकोला.अमरावती.भंडारा.बुलढाणा.चंद्रपूर.गडचिरोली. गोंदिया.नागपूर.वर्धा.वाशिम.यवतमाळ.या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.दरम्यान या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी वर्गाच्या फळबागा उध्दवस्त झाल्या आहेत तर हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान नागपूरात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.नागपूरात सध्या पाऊस सुरू आहे.तर परभणी व अकोला मध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.भंडारा व बुलढाणा . अमरावती मध्ये विविध ठिकाणी वादळ व वा-यांसह पाउस पडत आहे तर वीजेच्या कडकडाटासह मुसाळधार पाऊसाने हजेरी लावली आहे.यामुळे शेती मालाचे प्रचंड प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.संभाजी नगर येथे शेतात काम करीत असताना वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.तर बीड येथे देखील शेतात काम करताना वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.तर त्या महिलेचा मुलगा गंभीर रित्या जखमी झाला आहे.