पुणे दिनांक १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी चांगली आनंदाची बातमी आहे.हवामान विभागाच्या वतीने यावर्षी होणा-या मान्सून बाबत म्हत्वाची न्यूज दिली आहे.संपूर्ण भारत देशात पाऊस चांगलाच मेघगर्जनेसह कोसळणार आहे. दरम्यान या वर्षी मान्सून ८ जून पर्यंत हजेरी लावणार आहे.तसेच जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असणार आहे.अशी माहिती हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक एम.मोहपात्रा यांनी दिली आहे.
दरम्यान सध्याची असणारी परिस्थिती ही मान्सून करीता चांगली आहे. दक्षिण व पश्चिम मान्सूनच्या दुष्टीकोणातून समुद्रातील परीस्थिती ही आशादायी आहे.यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.यंदाचा पावसाळा हा ८ जून पासून सुरू व्होऊन तो सप्टेंबर महिन्या पर्यंत राहाणार आहे.या दरम्यानच्या काळात पाऊस ८७ टक्के पडण्याची शक्यता आहे.संपूर्ण भारतात ५ जून ते ३० सप्टेंबर च्या कालावधीत १०४ ते १०६ पाऊस कोसळणार आहे.दरम्यान सध्याच्या परिस्थितीत अल निनोचा प्रभाव हा कमी होत असून पावसाळा सुरू झाल्यावर त्याचा प्रभाव संपेल असे देखील हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान सुधारीत पाऊसाचा अंदाज हा में महिन्यात वर्तवला जाणार आहे.