पुणे दिनांक १७ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे आज पुन्हा गोळीबाराच्या घटनेने चांगलेच हादरले आहे .पुणे ते सोलापूर महामार्गावर असलेल्या हडपसर येथील शेवाळेवाडीत ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला आहे.सोसायटी सिक्युरिटी कामगार पळविण्याच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला आहे.एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर गोळीबार केला आहे.यात एक ठेकेदार गंभीर रित्या जखमी झाला आहे.जखमी ठेकेदाराचे नाव जयवंत खलाटे ( रा.सैनिक काॅलनी गोंधळेनगर हडपसर पुणे.मुळ रा.बारामती ) असे आहे.तर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीचे नाव सुधीर रामचंद्र शेंडगे ( रा.सैनिक काॅलनी गोंधळेनगर हडपसर पुणे मुळ या.भोर ) व ऋषिकेश शेंडगे यांना हडपसर पोलिसांनी 👮 अटक केली आहे.यातील खलाटे व शेंडगे हे दोघेजण देखील माजी सैनिक आहेत.या प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.