Home क्राईम पुण्यात जंगली महाराज रोडवर भरदिवसा पल्सर वरुन आलेल्या दोघांनी पिस्तूल मधून गोळीबार...

    पुण्यात जंगली महाराज रोडवर भरदिवसा पल्सर वरुन आलेल्या दोघांनी पिस्तूल मधून गोळीबार करण्याचा केला प्रयत्न

    754
    0

    पुणे दिनांक १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शिवाजीनगर येथील जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स येथे ऑफिस मधील काम करुन घरी जाणा-या ३८ वर्षीय युवकाच्या गाडीवर बजाज पल्सर वरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर पिस्तूल मधून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.यावेळी अचानकपणे पिस्तूल लाॅक झाल्याने पिस्तूल मधून गोळीबार होऊ शकला नाही.दरम्यान यावेळी कारचालक याने आरडाओरडा केल्याने पल्सर वरुन आलेले हल्लेखोर हे घटनास्थळा वरुन फरार झाले.

    दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धीरज अडगळे ( वय ३८ रा.खडकी पुणे) हे दिनांक १६ एप्रिल रोजी पावने तीन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर जगंली महाराज रोडवरील अरगडे हाईट्स येथील ऑफिसचे काम संपवून कार मधून घरी जात असताना कारच्या ड्रायव्हिंग सीटच्या दरवाजाच्या बाजूला बजाज पल्सर वरुन आलेल्या दोघां अज्ञात व्यक्ती पैकी एकाने पिस्तूल काढून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.यावेळी अचानकपणे पिस्तूल मधून गोळीबार होऊ शकला नाही.यावेळी पिस्तूल लाॅक झाल्याने गोळीबार होऊ शकला नाही.यावेळी अरगडे यांनी आरडाओरडा केल्याने.हल्लेखोर हे बजाज पल्सर वरुन पळून गेले.या प्रकरणी धीरज अरगडे यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.पोलिसांनी अज्ञात दोघा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत हे करीत आहेत.

    Previous articleखडकवासल्यात शाॅकसर्किटमुळे डंपरला भीषण आग 🔥
    Next articleट्रेलर व कारचा भीषण अपघात १० जणांचा मृत्यू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here