Home क्राईम सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

    सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

    305
    0

    पुणे दिनांक १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) परभणी जिल्ह्यात एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरची कारवाई ही परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने उपनिरीक्षकावर करण्यात आली आहे.या प्रकरणी नानलपेठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान परभणीत तक्रारदाराच्या भावजीचे एम एल सी जबाबाच्या केलेल्या कामाच्या बदल्यात सहाय्यक उपनिरीक्षक संजय मुंढे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदाराने या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती.या नंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक संजय मुंढे यांच्यावर सापळा रचून त्यांना तक्रारदार यांच्या कडून १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.व या अधिका-या विरोधात परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Previous articleदाऊद इब्राहिम व छोटा शकील गॅंगकडून एकनाथ खडसे यांना जीवे ठार मारण्याची धमकी राजकीय वर्तुळात एकच खळबळ
    Next articleखडकवासल्यात शाॅकसर्किटमुळे डंपरला भीषण आग 🔥

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here