Home क्राईम बाॅलिवृडचा सुपर स्टार सलमान खानच्या निवासस्थांनावर गोळीबाराचे पुणे कनेक्शन गोळीबार प्रकरणी पुण्यातून...

    बाॅलिवृडचा सुपर स्टार सलमान खानच्या निवासस्थांनावर गोळीबाराचे पुणे कनेक्शन गोळीबार प्रकरणी पुण्यातून आवळल्या दोघांच्या मुसक्या

    1140
    0

    पुणे दिनांक १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बाॅलिवूडचा सुपर स्टार सलमान खान याच्या निवासस्थानी गोळीबार प्रकरणी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस यांनी मोठ्या व अनेक पथके तयार करून शोध मोहीम राबविण्यात येऊन ४८ तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.यात अजून नव नवीन अपदेड समोर येत आहे.आता नवीन खळबळ जनक खुलासा समोर आला आहे.दरम्यान अभिनेता सलमान खान यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबारात पुण्यातील दोन जणांच्या मुसक्या मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

    दरम्यान याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावे १) सचिन पोटे.२) तुषार काळे यांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान अभिनेता सलमान खान यांच्या निवासस्थानी गोळीबार करण्यासाठी वापरण्यात येणारे पिस्तूल वरील दोघां आरोपींच्या गाडीतून जप्त केले असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. दरम्यान अभिनेता सलमान खान याला घाबरविण्यासाठी बिश्नोई गॅंगकडून या आरोपींवर जबाबदारी देण्यात आली होती.दोन मॅगझीन निवासस्थानी फायर करण्याचे टार्गेट दोन आरोपी यांना देण्यात आले होते.एकूण १२ गोळ्या फायर करण्याचे आदेश दिले होते.मात्र या आरोपींना एवढे राऊंड फायर करता आले नाही.यातील आरोपींना या कामांकरिता १ लाख रुपये देण्यात आले होते.अशी माहिती चौकशी अंती समोर आली आहे.दरम्यान ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर आरोपींना आणखी ३ लाख रुपये मिळणार होते.दरम्यान या प्रकरणी गॅंगस्टार लाॅरेन्स बिश्नोई यांचा भाऊ अनमोल बिश्नोई याला देखील गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.लाॅरेन्स बिश्नोई हा पंजाब येथील जेल मध्ये असून त्यांच्यावर पंजाबचा गायक सिध्दू मुसेवाला यांची हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.तर मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या निवासस्थानी गोळीबार केल्यानंतर अनमोल बिश्नोई यांने फेसबुकवर पोस्ट करुन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.अनमोल बिश्नोई हा सध्या कॅनडा येथे असून त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी 👮 लुक-आऊट सर्क्लुलर जारी करण्यात येऊ शकते तर लाॅरेन्स बिश्नोई याला देखील तपासासाठी पंजाब जेल मधून मुंबईत आणण्याची शक्यता आहे?.असे खात्रीलायक सूत्रांनद्रारे माहिती मिळत आहे.

    Previous articleपुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच काडीपेटी मागण्या वरुन एकावर आज पहाटे गोळीबार लागोपाठ तिसरी घटना
    Next articleपुण्यात कोयता गॅग संपुष्टात आता डायरेक्ट पिस्तूल गॅंग जोरात? सलग चौथ्या दिवशी येरवड्यात आज पहाटे गोळीबार एकजण जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here