पुणे दिनांक १९ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात शिक्षणाच्या माहेरघरात पहिला कोयता गॅगने धुमाकूळ घातला होता. आता कोयता गॅग संपुष्टात आली आहे.त्याची जागा आता डायरेक्ट पिस्तूल गॅंगचा पुण्यात जोर वाढला आहे.प्रश्न असा आहे.की एवढे पिस्तूल पुण्यात आले कसे ? हा एक मोठा गंभीर असा प्रश्न आहे.आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास येरवडा येथे गोळीबार झाला आहे.यात एका तरुणावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.यात संबंधित युवक हा गंभीर रित्या जखमी झाला आहे.पूर्ववैमानस्यातून हा प्रकार झाला आहे.अशी प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास येरवडा अग्रेसन हायस्कूल समोर हा गोळीबाराचा प्रकार घडला आहे.आकाश चंदालेने विकी चंदाले यांच्या वर हा गोळीबार केला आहे.यात तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.त्यातील एक गोळी ही विकी याला लागल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला आहे.या गोळीबार प्रकरणी येरवडा पोलिसांनी 👮 एकाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान हे दोघेजण एकामेकाचे नातेवाईक आहेत. यांच्यात जुन्या भांडणाचा वाद होता . त्यातून हा प्रकार घडला आहे.आज सलग चौथ्या दिवशी हा गोळीबार झाल्यानंतर पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.आता कोयता गॅग संपुष्टात आल्या नंतर आता डायरेक्ट पिस्तूल गॅंगने पुण्यात धुमाकूळ घातला आहे.पुणे शहरात या गॅंगवर पुणे पोलिसांचे वचक राहिला नसल्याने ह्या गोळीबारा च्या घटनेत रोज वाढ होते आहे.या रोचक होणा-या गोळीबारानंतर पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.