पुणे दिनांक २० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देहूरोड येथील झेंडमळा भागात हातात कोयता घेऊन फिरणाऱ्यांवर पिंपरी -चिंचवड गुंडा विरोधी पथकाने एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आनंद नामदेव दणाने ( ३२ रा.चिंचवड ) असे आहे.या घटने बाबत देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक मयूर दळवी यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा देहूरोड येथील झेंडमळा या भागात हातात बेकायदेशीर रित्या कोयता घेऊन फिरत होता.पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याचावर भारतीय शस्त्र कायद्यानुसार देहूरोड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत.