पुणे दिनांक २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नाकाबंदी पोलिसांनी 👮 केली असून यात नाकाबंदी मध्ये २७ लाख रुपयांची रोकड सापडली आहे.दरम्यान रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई वरून वाकडच्या दिशेने येणाऱ्या गाडीची पोलिसांनी झडती घेतली असता यात ही रक्कम सापडली आहे.या रक्कम बाबत पोलिसांनी गाडी मालकांकडे चौकशी केली असता त्यांने आपण व्यावसायिक असून सदरची रक्कम आपली असल्याचे सांगितले आहे.दरम्यान पोलिसांनी ही रक्कम व गाडी ताब्यात घेतली आहे.