पुणे दिनांक २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे.आज कोल्हापूर येथे देखील अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे.दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर शेतीमालाचे नुकसान झाले आहे.तसेच घराचे देखील नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.दरम्यान अवकाळी पाऊसाचे चक्र हे सुरुच आहे. दरम्यान पुढील तीन दिवसांमध्ये लगातार वीजेच्या कडकडाटासह मुसाळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.तसेच पुण्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे देखील आवाहन हवामान विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.
पुणे शहरात तापमान मोठ्या प्रमाणावर आहे.आज कमाल तापमान हे ३९.६ होते.तर किमान तापमान हे २१.७ अंश सेल्सिअस असे होते. दरम्यान येणाऱ्या दिनांक २५.२५.२६.एपिल रोजी आकाश हे निरभ्र राहणार असून दुपार नंतर आकाश अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे.दरम्यानच्या कालावधीत मेघगर्जनेसह व वीजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.असे हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.