Home क्राईम पुण्यात मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    पुण्यात मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    180
    0

    पुणे दिनांक २७ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील गणेश खिंड रोडवरील हर्डीकर हाॅस्पीटल येथील मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांच्या शिवाजीनगर पोलिसांनी 👮 मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे या प्रमाणे आहेत.१) सागर रमेश वैरागळ ( वय २७ ) २) रवी दिलीप अडागळे (वय २९ दोघे रा.इंदिरानगर गुलटेकडी पुणे) अशी आहेत.याबाबत एका युवकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

    दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील शिवाजीनगर परिसरात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.सदरच्या कामांकरिता गणेशखिंड रोडवरील हर्डीकर हाॅस्पीटल समोर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते.दरम्यान गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सागर व रवी हे दोघेजण लोखंडी साहित्य चोरुन नेत होते. त्याच वेळेस तेथून जाणाऱ्या युवकाने या दोघांना पाहिले व त्यांने या बाबत शिवाजीनगर पोलिसांना या बाबत माहिती दिली.शिवाजीनगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन या दोघांना अटक केली आहे.या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

    Previous articleमणिपूर मध्ये आज पहाटे कुकी कट्टरपंथीयांकडून सीआरपीएफ बटालियनवर हल्ला दोन जवान शहीद
    Next articleबसमध्ये तिकिटावरुन वाद.. बसच्या कंडक्टरवर 🗡️ हल्ला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here