पुणे दिनांक २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूर येथून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये एका प्रवाशाने कंडक्टरवर चाकू हल्ला करून त्याला मारहाण केली आहे.सदरचा वाद हा बसमधील प्रवासी व कंडक्टर या दोघांमध्ये तिकीटावरुन वाद झाल्याचे समजते.यात जखमी झालेल्या कंडक्टरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची बस ही नागपूर वरुन संभाजीनगरकडे जात होती.त्यावेळी बस मधील कंडक्टर योगेश काळे व प्रवासी फिरोज शेख यांच्यात तिकीटावरुन वाद झाला कंडक्टर काळे यांनी फिरोज याला तिकिट दाखव म्हणल्या नंतर त्यांने बसचे कंडक्टर यांना मारहाण केली व चाकूने वार केला.सदरची घटना ही कोंढाळी या गावाजवळ घडली आहे.दरम्यान सदरच्या घटनेनंतर बस मधील अन्य प्रवाशांनी फिरोज याला पकडले.व बस चालक चालक संतोष जाधव बस पोलिस ठाण्यात नेली .या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी फिरोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.व त्याला अटक केली आहे.या प्रकरणी पुढील तपास कोंढाळी पोलिस हे करीत आहेत.