पुणे दिनांक २९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार छत्तीसगड येथील बेमेत्रा येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत काठिया येथील पेट्रोल पंपावर रोडच्या कडेला थांबलेल्या माझदा कार भरघाव वेगाने येणाऱ्या पिकअप जीपने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकूण १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.यात लहान मुलांचा देखील समावेश आहे.यात अन्य २१ जण जखमी झाले आहेत.यातील ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने रायपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले आहेत.तर अन्य जखमी प्रवाशांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जीप मधील सर्व प्रवासी हे तिरक्या येथे एका कार्यक्रमा करीता गेले होते ते कार्यक्रम आटोपून पून्हा आपल्या गावी पात्रा येथे परतत असताना हा अपघात झाला.