पुणे दिनांक ३ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण भारतात आर्थिक सर्वेक्षण करून मागास असलेल्यांची संख्या किती आहे याचा अंदाज घेऊन त्याच बरोबर व तसेच जातीय जणगणाना करुन आरक्षणांची मर्यादा वाढविणार आहे. अशी घोषणा काॅग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.ते आज पुण्यात काॅग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
दरम्यान एकीकडे इंडिया आघाडी संविधान वाचवण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेतेमंडळी वारंवार संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत.भारतीय जनता पार्टी संविधान संपविण्याचे काम करीत आहे.असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.मी मागील अनेक वर्षापासून जातीनिहाय जनगणना संदर्भात मागणी करु लागलो आहे.तेव्हा पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणू लागले की या देशात दोनच जाती आहेत.एक श्रीमंत व एक गरीब.मध्येच ते अचानकपणे ते ओबीसी असल्याचा दावा देखील करत आहेत.काॅग्रेस पक्ष सत्तेवर आल्यावर आरक्षणांची मर्यादा आम्ही उठवू… ज्यामुळे मराठा व धनगर समाजाच्या युवकांना आरक्षणात वाटा मिळेल.असे देखील या वेळी गांधी यांनी सभेत म्हणाले.दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की.काॅग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर भारतामधील गरीबांची यादी आम्ही करु .त्या महिलांच्या खात्यांवर दरवर्षी एक लाख रुपये जमा करु.तसेच अग्र्नीवीर योजना रद्द करु.तसेच शेतकरी वर्गासाठी कर्जमाफी कमीशन तयार करु. असे देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.