पुणे दिनांक ४ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जम्मू -काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात भारतीय वायुसेनाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. स्थानिक रायफल्सच्या जवानांनी इकाई भागात दहशतवाद्यांना घेरले आहे.व शोधमोहीम सुरू केली आहे.तसेच लष्करी वाहने ही शाहसितार जवळील एअरबेसच्या आत सुरक्षित आहे.दरम्यान अचानकपणे दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर हल्ला केला.यात तीन जवान जखमी झाले आहेत.अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम दर्शनी दिली आहे.