पुणे दिनांक ४ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूर शहरात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.या भूकंपाचे धक्के नागपूरात काही ठिकाणी जाणावले असलेतरी काही ठिकाणी अनेक नागरिकांना या विषयी कल्पना नव्हतीच.दरम्यान या भूकंपाच्या धक्यांचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये.असं आवाहन केले आहे. दरम्यान भूकंप मापन यंत्रावर २.५ मॅग्रेट्यूड अशी या आजच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान नागपूर शहरातील पाच किलोमीटर परिसरात या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलाॅजीच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे.