Home क्राईम ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    584
    0

    पुणे दिनांक ७ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभाच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ११ ठिकाणी मतदान होत आहे.दरम्यान पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका निवडणूक केंद्रात ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  यांच्या विरोधात आता सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे चाकणकर ह्या अडचणीत सापडल्या आहेत.

    दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे.या मतदार संघात महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे या नणंद भावजया मध्ये लढत होत आहे. आज मंगळवारी लोकसभेचे मतदान होत असताना एका निवडणूक मतदान केंद्रावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चक्क ईव्हीएम मशीनची पूजा करून आरती केली व फुले वाहिली आहे.याचा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.दरम्यान या नंतर अनेकांनी सोशल मीडियावर अनेकांनी निवडणूक आयोगाच्या एक्स अकाउंटला टॅग करत या बाबत विचरणा केली आहे.

    Previous articleअहमदनगर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE विखे व लोखंडे यांच्या प्रचारार्थ
    Next articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आचारसंहिता भंग गुन्हा दाखल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here