पुणे दिनांक ७ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ जागांसाठी मतदान झाले आहे.दरम्यान पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात आसणा-या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी व मतदानाच्या पूर्वी सोमवार दिनांक ६ में रोजी रात्री उशिरापर्यंत बॅंक सुरू ठेवल्याप्रकरणी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.दरम्यान रात्रीच्या वेळेस बॅंकेत एकूण ४० ते ४५ कर्मचारी हे काम करीत होते.असे सी सी टिव्ही फुटेज शरदचंद्र पवार कटाचे आमदार व नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या सर्व प्रकरणाची खातरजमा करुन निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.