पुणे दिनांक ९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात पारा हा ४२ च्या पुढे गेला आहे.दरम्यान हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आज दुपार नंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ठिक ठिकाणी पाऊसाने आज गुरुवारी दुपारी हजेरी लावली आहे.पुण्यातील नांदेड सिटी.तसेच सिंहगड रोड.वडगाव.न-हे.या भागात रोडवर पाणी साचले आहे.तर जिल्ह्यात शिरूर.आंबेगाव.खेड.व जुन्नर या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे.
दरम्यान तसेच छत्रपती संभाजीनगर.यवतमाळ.नागपूर.बुलढाणा.या जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.तसेच यवतमाळ अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.गंगापूर.खुलताबाद.व पैठण तालुक्यात देखील काही भागात पाऊस पडला आहे.दरम्यान या पावसामुळे फळभाज्यांना चांगलाच फटका बसला आहे.