पुणे दिनांक १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सी बी आयच्या विषेश न्यायालयाने आज डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणांचा अंतिम निकाल दिला आहे.दाभोळकर यांच्या हत्यातील आरोपी १) सचिन अंदुरे व २) शरद कळसकर या दोघांना तब्बल ११ वर्षांनंतर दोषी ठरविण्यात आले आहे.या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.तर अन्य तीन जणांना पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.त्यांची नावे १) वीरेंद्र तावडे २) विक्रम भावे ३) संजीव पुनाळेकर अशी आहेत
दरम्यान डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणांतील निकाला नंतर हमीद दाभोलकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की दोन मारेकऱ्यांना शिक्षा झाली.ही न्यायालयावर विश्र्वास अधोरेखित करणारी बाब आहे. पण जे सुटले.त्यांना देखील शिक्षा व्हावी यासाठी हायकोर्टात जाणार आहे.असे ते म्हणाले.यात गोविंदा पानसरे.गौरी लंकेश.व कुलबुर्गी यांची हत्या एक व्यापक कटाचा भाग आहे.या कटामागचे मुख्य सूत्रधार बाहेर आहेत.तोपर्यत विवेकी लोकांना धोका आहे.असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.