पुणे दिनांक ११ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत.दिनांक १३ मे रोजी रोजी सोमवारी मतदान होणार आहे.यात पुणे.मावळ.शिरुर . अहमदनगर.शिर्डि.बीड.जालना . छत्रपती संभाजीनगर.नंदुरबार.रावेर.जळगाव.या मतदार संघातील दिग्गज उमेदवारांचा समावेश असून आज अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सांगता सभा सायंकाळी सहा वाजता संपल्या आहेत.आता या उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत सोमवारी दिनांक १३ मे रोजी मतदान पेटीत बंद होणार आहे.अजून तीन टप्प्यांत मतदान होणार आहे.या सर्वांचा निकाल दिनांक ४ जुन रोजी मतमोजणी होणार आहे.