पुणे दिनांक ११ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुट्टी असल्याने बाहेरगावी गेलेल्या सिंहगड रोडवरील एका डाॅक्टरच्या बंगल्यात चोरी करून ४४ लाख रुपये १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेणा-या तीन जणांच्या सिंहगड पोलिसांनी मुसक्या आवळून यात चोरी करण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे १) संकेत प्रकाश निवंगुणे ( वय २३ रा. बानगुडे चाळ वारजे माळवाडी पुणे) २) सुरज शिवाजी भरडे ( वय २४ रा.शिवसाईनगर सुतारदरा कोथरूड पुणे) ३) लक्ष्मण आण्णा जाधव (वय ३८ रा.गोसावी वस्ती कोथरूड पुणे) अशी आरोपींचु नावे आहेत.
सदर चोरी प्रकरणी सिंहगड रोड 👮 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत मधुसूदन आठल्ये ( वय ६८ रा.आनंदनगर सिंहगड रोड पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती.२७ ते २८ एप्रिल रोजी ही चोरी झाली होती.आठल्ये हे सुट्टी निमित्ताने बाहेर गावी गेल्यावर चोरट्यांनी बेडरूम मधील कपाटाचे लाॅक तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.सदर चोरी बाबत सिंहगड रोड पोलिस हे तपास करीत असताना या चोरी मधील आरोपी सिंहगड रोड वरील तुकाईनगर सर्कल येथे थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापेमारी करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.व चोरीचि मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार.पोलिस सहआयुक्त प्रविण पवार.अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील पोलिस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त भिमराव टिळे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार.पोलिस निरीक्षक ( गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर.यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम.पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर . पोलिस अंमलदर आंबा उत्तेकर .संजय शिंदे.उत्तम तारु.राजु वेगळे.विकास बांदल.देवा चव्हाण.शिवाजी क्षिरसागर.राहुल ओलेकर.सागर शेंडगे.स्वन्पील मगर.विनायक मोहिते यांच्या पथकाने केली आहे.