Homeक्राईमघाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींचा खर्च राज्य...
घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींचा खर्च राज्य सरकार करणार दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे मोठे होर्डिंग्ज कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.सदरच्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.तर ५९ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान सदरच्या होर्डिंग्ज दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व पाहाणी केली आहे.यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.तर यात जखमी झालेल्या लोकांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान यात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आतापर्यत एकूण ३५ लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान कोसळलेले होर्डिंग्ज हे अनधिकृत होते.याबाबत महानगरपालिकेच्या वतीने संबंधितांना नोटिस बजावण्यात आली होती.अशी माहिती आता पुढे येत आहे.होर्डीग दुर्घटना प्रकरणी दोषी असणाऱ्या व्यक्तींविरोधी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.तसेच शहरातील अन्य सर्व होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.दरम्यान पाऊस येत असल्याने अनेकजण पावसापासून बचावासाठी पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता.पण या लोकांवर काळानं घाला घातला आहे.दरम्यान हे होर्डिंग्ज दुर्घटनेतील जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याची माहिती मिळाल्यानंतर जखमी झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयात धाव घेतली आहे.तर या दुर्घटनेत बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच टाहो फोडला आहे.