पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगावशेरी भागात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा मतदानासाठी लागल्या आहेत.एक तासांपेक्षा जास्त वेळ मतदार हे पुणे इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर ताटकळत उभे आहेत.येथील एका खोलीतील ईव्हीएम मशीन सकाळीच बंद पडले आहे.त्यामुळे उन्हाच्या अधी सकाळीच मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा एकंदरीत खेळ खंडोबा झाला आहे.दरम्यान प्रशासनाच्या वतीने आता दुसरे ईव्हीएम मशीन आणल्या नंतरच येथील मतदान सुरळीतपणे सुरू व्होईल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान अशीच घटना सकाळी संभाजीनगर येथे पण घडली आहे. ईव्हीएम मशीन बंद पडली आहे.त्यामुळे नागरिक मतदान केंद्रावर थांबून आहेत.येथेतर तब्बल २५ ठिकाणी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार हे सकाळ पासून मतदान केंद्रावर ताटकळत उभे राहिले होते.व मतदान केंद्रावर रांगाच रांगा लागल्या होत्या.दरम्यान उन्हाळा भयंकर असल्याने अनेक मतदार हे सकाळीच लवकर मतदान उरकून घेण्यासाठी केंद्रावर आले पण ईव्हीएम मशीन बंद पडल्याने त्यांची निराशा झाली आहे.दरम्यान या ठिकाणी निवडणूक कर्मचारी यांनी दुसऱ्या ईव्हीएम मशीन आणल्या नंतर या २५ केंद्रावरील मतदानाला सुरुवात झाली आहे.