Home क्राईम पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

    पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

    235
    0

    पुणे दिनांक १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.सीबीआयच्या एका खटल्यात त्यांना जामीन देण्यात आला आहे. परंतु आणखी एका खटल्यात त्यांना जामीन होणे अजून बाकी आहे.

    दरम्यान अविनाश भोसले हे मागील दोन वर्षांपासून सीबीआयच्या कोठडीत आहे मे २०२२ रोजी त्यांना सीबीआयने अटक केली होती.दरम्यान मागील एक वर्षापूर्वी त्यांनी हायकोर्टात जामीन साठी हायकोर्टात धाव घेतली होती.परंतू हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती.त्या नंतर त्यांना हायकोर्टाने सीबीआय च्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.परंतू अद्याप ईडीच्या प्रकरणात त्यांना अद्याप दिलासा मिळाला नाही.त्यामुळे आता त्यांची तुरुंगामधून सुटका होतेय की नाही हे पाहावं लागणार आहे.

    Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य रोड शो.सगळीकडे गर्दीच गर्दी!
    Next articleमुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेला दहा दिवसांची पोलिस कस्टडी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here