Home Breaking News शहीद कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

223
0

पुणे दिनांक १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शहीद कर्नल वैभव अनिल काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पोलिस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहीद कर्नल वैभव काळे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.भारतीय सैन्याच्या वतीने दक्षिण कंमाडचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आर.एस.सुंदरम यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.शहीद कर्नल वैभव काळे यांचा मुलगा वेदांत व मुलगी राधिका यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.यावेळी वैभव काळे यांच्या मातोश्री रचना काळे पत्नी अमृता काळे व भाऊ विंग कमांडर अक्षय काळे आणि सासरे कर्नल विवेक खैरे.( नि.) उपस्थित होते. यावेळी लष्कराचे विविध आजी माजी अधिकारी विविध विभागांचे अधिकारी आणि नागरीकही शाहीद काळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.सियाचीन ग्लेशियर कारगिल जवळील द्रास. संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत काॅगो.ईशान्य भारत येथील सेवांसह पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्यावेळी तुकडीचे नेतृत्व केलेले कर्नल ( निवृत्त) वैभव अनिल काळे (वय ४६ ) यांना संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक म्हणून गाझामध्ये सेवा बजावत असताना वीरमरण आले.

Previous articleकागल येथे वेदगंगा नदीत यात्रेकरीता आलेल्या चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Next articleभाविकांच्या धावत्या बसला भीषण आग 🔥 बस पेटल्याने आठ जणांचा मृत्यू तर होरपळून २४जण गंभीर रित्या भाजले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here