पुणे दिनांक २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवार महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वत्र सकाळी सात वाजल्यापासून १३ जागांवर मतदान होत आहे.येतच आता अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती मिळत आहे.तर कुठे बोगस मतदान झाल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.यात ठाण्यातील नौपाडा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.येथील मशीन दुरुस्त झाल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.तो प्रर्यत मतदारांना ताटकळत थांबावे लागणार आहे.दरम्यान आज ठाण्यातील कोपरी .पाच पाखडी भागात बोगस मतदान होणार आहे.एकूण दीड हजार लोक बोगस मतदान करणार आहे.उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान आज पालघर येथे सकाळी मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना सफाळे.दातिवरे या केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडले असून मतदान केंद्रावर मतदार हे अनेक तासांहून अधिक वेळ रांगेत ताटकळत उभे राहिले आहेत.ईव्हीएम मशिन बंद पडल्याने मतदार देखील हैराण झाले आहेत.तसेच सिन्नर येथे देखील ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर बंद पडल्याची माहिती मिळत आहे.सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ईव्हीएम मशीन बंद पडल्याने अनेक मतदार हे मतदान केंद्रावर ताटकळत उभे आहेत.व रांगेत उभे राहून कंटाळले आहेत. आज अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती मिळत आहे.